Helicopter Crash | मृत्यूशी झुंज अपयशी! ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचं अखेर निधन

Helicopter Crash | मृत्यूशी झुंज अपयशी! ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचं अखेर निधन

| Updated on: Dec 15, 2021 | 1:12 PM

संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Group Captain Varun Singh) यांचे निधन झाले.

नवी दिल्ली : संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Group Captain Varun Singh) यांचे निधन झाले. बंगळुरुतील रुग्णालयात आठवड्याभराच्या उपचारांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. 8 डिसेंबरला तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते.