मनोज जरांगे यांच्या अल्टिमेटम या शब्दांवरून गुणरत्न सदावर्ते यांनी घेरलं, जर कोणी आरक्षण मागत असेल तर…
VIDEO | मराठा आरक्षण मिळावं, यासाठी मराठे आक्रमक झाले असले तर शांततेच्या मार्गानं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण मराठ्यांना देण्यासठी अल्टिमेटम दिलंय. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय, बघा काय दिला इशारा?
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण मराठ्यांना देण्यासठी अल्टिमेटम दिलंय. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय. अल्टिमेटम हा शब्द महाविकास आघाडी काळातील असून लोकशाही प्रधान देशात वापरला जातोय. ठराविक दिवसात आरक्षण द्या, अशा प्रकारचे अल्टिमेटम हे लोकशाहीमध्ये चालत नसतात. या देशाचे मराठा समाजाला कोणाचाही व्यक्तिगत विरोध नाही. परंतु संविधानिकदृष्ट्या मराठा आरक्षण देता येत नाही. पण जर आम्ही बघून घेऊ, दाखवून देऊ, धमकीच्या शब्दांमध्ये तर ते सुद्धा कायदा संमत नसल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. या देशाचं स्तंभ असलेल्या 50% खुल्या वर्गातल्या जागा गुणवंतांसाठी आहेत. ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. जातीच्या पलीकडे जाऊन देश म्हणून मी विचार करत आहे. कोणत्याही जातीचा अवमान करणं माझ्या डोक्यात नाही. परंतु या देशाची गुणवत्ता कायम राहिली पाहिजे. जर मुस्कटदाबी करून जर अशाप्रकारे जर आरक्षण कोणी मागत असेल तर मला सुद्धा प्राणांतिक उपोषण करावं लागेल. खुल्या वर्गातल्या जागांमध्ये असतात या सगळ्यांसाठीची लढाई मी लढेल, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.