Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते, थेट मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबईत धडकणाऱ्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची ही याचिका असून न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी सुरू
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेना आपला पायी मोर्चा २० जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथून हजारो मराठ्यांसह काढला होता. तो मोर्चा आता पुण्यात येऊन धडकला आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबईत धडकणाऱ्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची ही याचिका असून न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. जरांगेंच्या या आंदोलनाला कोणतीही परवानगी नसतानाही आंदोलन सुरू असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना परवानगी देऊ नये अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली आहे. सध्या या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे.
Published on: Jan 24, 2024 04:38 PM
Latest Videos