'... तर कारवाई का नाही?', रवींद्र वायकर यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण; हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल

‘… तर कारवाई का नाही?’, रवींद्र वायकर यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण; हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल

| Updated on: Aug 08, 2023 | 8:09 AM

VIDEO | रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेलसंदर्भातील माहिती लपविल्यावरून मुंबई हायकोर्टानं मुंबई महापालिकेला नेमका काय केला सवाल?

मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी पूर्ण झालीय. मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबच्या जागेवर वायकर पंचतारांकित हॉटेल बांधत आहेत. मात्र पालिकेने काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशा विरोधात वायकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र सुनावणी पूर्ण झाली असून रवींद्र वायकर यांनी माहिती लपवली तर अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?, असा सवाल मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेला केला आहे. दरम्यान, रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेलसंदर्भातील माहिती लपविल्यावरून मुंबई हायकोर्टानं मुंबई महापालिकेला हा सवाल केला आहे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टात दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालाय. मुंबई हायकोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांमध्ये अंतिम निकाल समोर येण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 08, 2023 08:09 AM