Mumbai Rain Update | ठाणे, मुलुंडमध्ये मुसळधार पाऊस, रस्ते जलमय, वाहतूक विस्कळीत
मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. मुंबईत तुफान पाऊस बरसतोय. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. मुंबईत तुफान पाऊस बरसतोय. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर सकाळी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळतीय. मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. आजही पाउस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Latest Videos