HMPV Virus : चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, ह्यूमन मेटान्यूमोचा पहिला रूग्ण कुठं? चिमुकलीला लागण
बंगळुरूतील एका 8 महिन्याच्या मुलाला HMPV या खतरनाक व्हायरसची लागण झाली असून त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतातही या व्हायरसने प्रवेश केल्याने चिंतेचे वातावरण आहे.
भारतामध्ये ह्यूमन मेटान्यूमोचा पहिला रुग्ण आढळल्याचं कळतंय. बंगळुरूमधील आठ महिन्याच्या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमो या विषाणूची लागण झाली आहे. तर या चिमुकलीची प्रकृती सध्या ठीक असल्याची ही माहिती आहे. चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय आणि अशातच भारतामध्ये सुद्धा याचा पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त होतेय. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातल्या बंगळुरू शहरांमध्ये एका आठ महिन्याच्या चिमुकलीला या विषाणूची लागण झालेली आहे. या आजारामध्ये सर्दी, खोकला आणि त्यामुळे झालेल्या श्वसनाच्या आजार त्यातून उद्भवतो. लहान मुलं, वृद्ध असतील किंवा कमी रोगप्रतिकारशक्ती असेल त्यांच्यामध्ये या विषाणूची लवकर लागण होत असते. जेव्हा कोरोना व्हायरस आलेला होता त्यावेळेला देखील पहिला रुग्ण हा केरळमध्ये म्हणजे दक्षिण भारतातच सापडलेला होता आणि आता देखील एका लहान बाळाला बंगळुरूमध्ये याची लागण झालेली आहे. भारतात हा व्हायरस रोखण्यासाठी दिल्लीत आरोग्य अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. रविवारी झालेल्या बैठकीनंतर काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, (आरोग्य सेवा) महासंचालकडॉ वंदना बग्गा यांनी रविवारी मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि आयडीएसपीचे राज्य कार्यक्रम अधिकारी यांची बैठक घेतली.