शरद पवार यांना देण्यात आलेल्या 'त्या' धमकीनंतर गृहमंत्री फडणवीस यांचा इशारा

शरद पवार यांना देण्यात आलेल्या ‘त्या’ धमकीनंतर गृहमंत्री फडणवीस यांचा इशारा

| Updated on: Jun 09, 2023 | 12:15 PM

VIDEO | शरद पवार यांच्या जीवाला धोका, आलेल्या धमकीनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा काय?

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून एका व्यक्तीने ही धमकी दिली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. ‘ पवार साहेब हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना काहीही झालं तर ती केवळ राज्याचेचे नव्हे तर देशाचं गृहखातंही जबाबदार असेल’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, शरद पवारांना काही झालं तर त्याला गृहखातं जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना देण्यात आलेल्या ‘त्या’ धमकीनंतर इशारा दिला आहे. राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही. शरद पवार यांच्यापाठोपाठ संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published on: Jun 09, 2023 12:15 PM