Kalyan-Dombivli Rain : कल्याण-डोंबिवलीत तुफान पाऊस, रिमझीम पडणाऱ्या पावसानं धरला जोर अन्...

Kalyan-Dombivli Rain : कल्याण-डोंबिवलीत तुफान पाऊस, रिमझीम पडणाऱ्या पावसानं धरला जोर अन्…

| Updated on: Jun 20, 2024 | 12:56 PM

सकाळपासूनच कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस होतोय. मुंबईच्या पूर्व उपनगरात सकाळपासून पावसाची चांगलीच बॅटिंग सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीसह ठाणे, भांडूपमध्येही मुसळधार पाऊस पडतोय. राज्यातील अनेक शहरात तुफान पाऊस सुरु आहे. तर भिवंडीतील सखल भागात पावसाचं पाणी साचताना दिसतंय.

राज्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याचे पाहायला मिळाले. मुंबईकर पुन्हा पावसाची चांगलीच प्रतिक्षा करत होते. अशातच दडी मारलेल्या पावसाने चांगलंच कमबॅक केलं आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपाऊस पावसाची रिपरीप पाहायला मिळाली मात्र आज सकाळपासूनच कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. रिमझीम पडणाऱ्या पावसानं आज सकाळपासूनच चांगला जोर धरला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या पूर्व उपनगरात सकाळपासून पावसाची चांगलीच बॅटिंग सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीसह ठाणे, भांडूपमध्येही मुसळधार पाऊस पडतोय. राज्यातील अनेक शहरात तुफान पाऊस सुरु आहे. तर भिवंडीतील सखल भागात पावसाचं पाणी साचताना दिसतंय. यासोबत गुडघाभर पाणी साचल्याने भिवंडीतील बाजारपेठ आणि दुकानं काहिशी पाण्यात गेली असून दुकानदारांचं नुकसान झालं आहे.

Published on: Jun 20, 2024 12:56 PM