Maharashtra Weather Update : मोठी बातमी… राज्यात पावसाचा जोर कायम, काय म्हणतंय हवामान खातं?
राज्याच्या विविध भागात काही भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. मुंबईतील हवामानासंदर्भात सांगायचे झाले तर दादर परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावासाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात काही भागात मुसळधार पाऊस होत आहे, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. अशातच मुंबईतील हवामानासंदर्भात सांगायचे झाले तर दादर परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावासाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने चांगलीच बॅटिंग केली असून चांगलंच झोडपून काढले आहे. हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासह महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. यासह पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.