Maharashtra Rain Forecast : राज्यातील Monsoon रखडला… आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्याला IMD कडून अलर्ट
Imd Monsoon Rain Forecast Maharashtra Weather Latest Update कोकण आणि मराठवाड्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागात मान्सून रखडला असल्याने नागरिकांना अजूनही कडाक्याच्या उन्हाचा सामाना करावा लागत आहे.
मान्सून संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोकण आणि मराठवाड्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागात मान्सून रखडला असल्याने नागरिकांना अजूनही कडाक्याच्या उन्हाचा सामाना करावा लागत आहे. राज्यातील काही भागात मान्सून रखडला असून काही भागात मान्सूनची आगेकूचही मंदावली आहे. यामुळे विदर्भातील तापमानात वाढ होत आहे. इतकंच नाही तर विदर्भकरांना पावसाची मोठी प्रतीक्षा आहे. रविवारी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील तीन दिवस विजांसह पाऊसाचा अंदाज आहे. तर दोन दिवस विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. यासोबतच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तळकोकणासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई आणि ठाणे परिसरात २१ जूननंतर जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.