Special Report | कोरोनाचा संसर्ग वाढला..तरी नियमांचा फज्जा -tv9

Special Report | कोरोनाचा संसर्ग वाढला..तरी नियमांचा फज्जा -tv9

| Updated on: Jan 02, 2022 | 9:21 PM

राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी कमी होत नसल्यामुळे रुग्णावाढ पुन्हा डोक वर काढू लागली आहे. सक्रिय रुग्णसंख्येसोबतच नव्या रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी जमावबंदी आणि निर्बंध, नाईट कर्फ्यू लागू करण्यात आले आहेत. मात्र त्याचं पालन होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांनी महडमधील वरदविनायकाचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती.

राज्यात एकीकडे कोरोनाचे नियम अधिकाधिक कठोर करण्याचा इशारा सरकार आणि प्रशासनाकडून दिला जातो आहे. मात्र राज्यातील गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी कमी होत नसल्यामुळे रुग्णावाढ पुन्हा डोक वर काढू लागली आहे. सक्रिय रुग्णसंख्येसोबतच नव्या रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी जमावबंदी आणि निर्बंध, नाईट कर्फ्यू लागू करण्यात आले आहेत. मात्र त्याचं पालन होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांनी महडमधील वरदविनायकाचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती. मोठ्या संख्येनं भाविक मंदिरात दाखल झाले असल्यानं मोठीच्या मोठी रांग यावेळी लागल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजले होते.