संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं पाकिस्तानला पाडलं उघडं, संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला देत आणलं गोत्यात
दहशतवादाला आश्रय देणारे आणि संपूर्ण प्रदेशाला अस्थिर करणारे ‘दुष्ट राष्ट्र’ असे त्यांनी पाकिस्तानचे वर्णन केले आणि भारतीयांच्या भावना बोलून दाखवल्या.
युनायटेड नेशन्समध्ये भारताकडून पाकिस्तानची पोलखोल करण्यात आली. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला देत भारताने पाकिस्तानला उघडं पाडले. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानने भारतावर आरोप करत थयथयाट करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या यूएन मधील प्रतिनिधी योजना पटेल यांनी थेट पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्याच वक्तव्याचा दाखला दिला. पाकिस्तान गेल्या तीन दशकापासून दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले होते. त्याचाच दाखला देत योजना पटेल यांनी पाकिस्तानला उघड पाडलं.
Published on: Apr 29, 2025 05:22 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

