'बच्चा समझ के...', फुटबॉल खेळताना उदयनराजे भोसले यांची डायलॉगबाजी, बघा व्हिडीओ

‘बच्चा समझ के…’, फुटबॉल खेळताना उदयनराजे भोसले यांची डायलॉगबाजी, बघा व्हिडीओ

| Updated on: May 23, 2023 | 3:54 PM

VIDEO | उदयनराजे भोसले यांच्याकडून फुटबॉल मैदानाची पाहणी; पाहणी दरम्यान घेतला फुटबॉल खेळण्याचा आनंद

सातारा : सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून झालेल्या अनेक विकास कामांचा आढावा खासदार उदयनराजे स्वतः घेत आहेत. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शाहूनगर येथील फुटबॉल मैदानाची पाहणी केली. ही पाहणी करत असताना खासदार उदयनराजे यांच्या चाहत्यांनी त्यांना समोर ठेवलेल्या फुटबॉलला लाथ मारण्याची विनंती केली. दरम्यान फुटबॉल अडवण्यासाठी 3 गोलकीपर उभे होते त्यांना फुटबॉलला हात आणि पाय न लावण्याची अट घालून उदयनराजे यांनी पायाने फुटबॉल उडवत “बच्चा समझ के छोड दिया” असा डायलॉग मारल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उदयनराजे भोसले यांनी फुटबॉल गेम हा खूप आवडतो असे सांगितले

Published on: May 23, 2023 03:54 PM