ठाकरे गटाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा; भाजपच्या जुन्या आरोपांवरून विरोधकांचा घेरा

ठाकरे गटाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा; भाजपच्या जुन्या आरोपांवरून विरोधकांचा घेरा

| Updated on: Jan 19, 2024 | 1:08 PM

ठाकरे गटातील नेत्यांच्या मागे चौकशीचा फेरा लागतोय. तर दुसरीकडे भाजपने याआधी केलेल्या आरोपांवरून विरोधक चांगलेच त्यांना घेरा घालताय. यामध्ये अजित पवार आणि नाना पटोले यांच्यातही चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई, १९ जानेवारी २०२४ : ठाकरे गटातील नेत्यांच्या मागे चौकशीचा फेरा लागतोय. तर दुसरीकडे भाजपने याआधी केलेल्या आरोपांवरून विरोधक चांगलेच त्यांना घेरा घालताय. यामध्ये अजित पवार आणि नाना पटोले यांच्यातही चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी नाना पटोले यांना एकेरी भाषेत उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा सुरू असताना विरोधक भाजपच्या भ्रष्टाचार मोहिमेवर वॉशिंगमशीनचा आरोप करताय. मागच्या दोन-तीन महिन्यात कुटे समुहावर आयकरचा छापा पडला तर कुटे यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला यावरून भाजप प्रवेशानंतर चौकशी बंद झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. यानंतर अद्वय हिरे, संजय बडगुजर, रोहित पवार, रवींद्र वायकर, सूरज चव्हाण आणि राजन साळवी यांच्यावर धाड पडून त्यांची चौकशी सुरू झाली. दरम्यान, भाजपने कोणत्या नेत्यांवर आरोप केले आणि आता कोणते नेते भाजपसोबत सत्तेत आहेत? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 19, 2024 01:08 PM