Special Report | मनसुख हिरेन हत्याकांडाचा प्रदीप शर्मा ‘मास्टरमाईंड’?
एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे.
एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएने शर्मा यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळी ताब्यात घेतल्यानंतर NIA ने त्यांना दुपारी अटक केली. आता NIA प्रदीप शर्मांना कोर्टात हजर करुन कोठडीची मागणी करणार आहे. (Is Pradip Sharma ‘Mastermind’ of Mansukh Hiren murder case)
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

