Jalna | शॉर्टसर्किटमुळं 5 एकर उसाला आग, शेतकऱ्यांची मदतीची मागणी

Jalna | शॉर्टसर्किटमुळं 5 एकर उसाला आग, शेतकऱ्यांची मदतीची मागणी

| Updated on: Jan 16, 2022 | 1:21 PM

शाॅर्ट सर्किटमुळं पाच एकर ऊसाला आग लागल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील वाढोण्यात घडली.

शाॅर्ट सर्किटमुळं पाच एकर ऊसाला आग लागल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील वाढोण्यात घडली. वाढोणा शिवारातील गटनंबर 62 मध्ये भागुबाई जनार्दन शेळके  आणि बाळासाहेब तनपुरे यांचा ऊस आहे.सध्या काही दिवसात त्यांचा ऊसही काढणीला आला होता. मात्र रात्री अचानक शेतावरून गेलेल्या विजेच्या तारेवर शाॅर्ट सर्कीट झालं. त्यामुळं ऊसाच्या शेतीला आग लागली. त्यात भागुबाई जनार्दन शेळके यांचा अडीच एकर तर बाळासाहेब तनपुरे यांचा अडीच एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळं शासनानं पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे..