जेजुरीच्या खंडोबाला अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार अर्पण

जेजुरीच्या खंडोबाला अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार अर्पण

| Updated on: Jun 10, 2021 | 3:37 PM

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावरील मार्तंड भैरवाच्या मूर्तीला सोमवारी अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार अर्पण करण्यात आला आहे.

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावरील मार्तंड भैरवाच्या मूर्तीला सोमवारी अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार अर्पण करण्यात आला आहे. खंडोबा देवस्थानचे विश्वस्त राजकुमार कांतीलाल लोढा यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय कमलाबाई लोढा यांच्या इच्छेनुसार हा हार अर्पण केला असल्याची माहिती लोढ़ा यानी दिली आहे. लोढ़ा यांच्या मोतोश्री कमलाबाई यांचे सव्वा वर्षापूर्वी निधन झाले आहे.

कमलाबाई लोढा यांना धार्मिक कार्याची आवड होती .खंडोबाच्या त्या निस्सीम भक्त होत्या, त्यांनी खंडोबाला चांदीचा हार करण्यासाठी अडीच लाख रुपये साठविले होते. परंतु त्यांचे निधन झाले .त्यामुळे त्यांची राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी लोढ़ा कुटुंबीयांनी विधिपूर्वक खंडोबाला हार अर्पण केला .यावेळी विश्वस्त राजकुमार लोढा त्यांच्या पत्नी विद्या, मुलगा सुमित उपस्थित होते. अर्पण करण्यात आलेला शुद्ध चांदीचा रत्नजडित हार मार्तंड भैरवाच्या मूर्तीला साजेसा बनवण्यात आला आहे. राजस्थान येथील कुशल कारागिरांनी हार तयार केला आहे.