Jitendra Awhad | आपले वडील आजारी असताना आपण चर्चा करतो का? जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांना सवाल

| Updated on: Dec 22, 2021 | 6:53 PM

आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? असा सवाल आव्हाडांनी केलाय. कुणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही प्रगल्भता नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येतील.

मुंबई : पाठीच्या मणक्यावरील शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत. काल सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमालाही मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर सवाल उपस्थित केले जात आहे. त्याचबरोबर जोरदार टीकाही सुरु आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? असा सवाल आव्हाडांनी केलाय. कुणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही प्रगल्भता नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येतील. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? ती आपली संस्कृती नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्याचबरोबर कुणी वैयक्तिक टीका करत असेल तर मी बोलणार नाही, असंही आव्हाडांनी आवर्जुन सांगितलं.