ओल्या काजूची उसळ, कोळंबी भात, पुरणपोळी अन्… उद्धव ठाकरे यांच्यासाठी कुणाकडून खास मेन्यू?
उद्धव ठाकरे घरी येणार म्हणून आमदार राजन साळवी यांनी घरात येणारे अतिथी म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासाठी जेवणाचा खास बेत आखला असून भन्नाट मेन्यूचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे आणि रशमी ठाकरे यांच्यासाठी ओल्या काजू गराची उसळ, बिरड्याची भाजी, कोळंबी भात आणि.....
रत्नागिरी, ५ फेब्रुवारी २०२४ : शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आमदार राजन साळवी यांच्या घरी भेट देणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रशमी ठाकरे यादेखील सोबत असणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे घरी येणार म्हणून आमदार राजन साळवी यांनी घरात येणारे अतिथी म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासाठी जेवणाचा खास बेत आखला असून भन्नाट मेन्यूचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे आणि रशमी ठाकरे यांच्यासाठी ओल्या काजू गराची उसळ, बिरड्याची भाजी, कोळंबी भात, पुरण पोळी, मोदक स्वादिष्ट असा मेन्यू ठेवला आहे. एसीबीने कारवाई अंतर्गत मोजमाप केलेल्या संपत्ती अंतर्गत पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचे देखील उद्धव ठाकरे यावेळी दर्शन घेणार आहेत.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

