'नथुराम गोडसे नसते तर...', कालीचरण महाराज यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

‘नथुराम गोडसे नसते तर…’, कालीचरण महाराज यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Apr 01, 2023 | 4:34 PM

VIDEO | 'नथुराम गोडसे यांनी जे केल ते...', कालीचरण महाराजांचं कोल्हापुरातून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, बघा काय म्हणाले?

कोल्हापूर : कालीचरण महाराज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, आता पुन्हा एकदा कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत असताना त्यांनी नथूराम गोडसे आणि महात्मा गांधी यांच्यावर भाष्य केले आहे. जेवढे नथुराम गोडसे वाचाल तेवढेल त्याचे भक्त व्हाल, आणि महात्मा गांधी यांचे विरोधक व्हाल. त्यामुळे नथुराम गोडसे यांनी जे केले ते योग्यच केले असं वादग्रस्त वक्तव्य कोल्हापूरात आलेल्या कालीचरण महाराज यांनी केले असून त्यांच्या यावक्तव्यामुळे खळबल उडाली आहे. यामुळे आजही त्यांनी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी केलेली हत्या ही योग्यच असल्याचे त्यांनी सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे म्हटले आहे. कोल्हापूरात आल्यानंतर अनेक वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Published on: Apr 01, 2023 03:56 PM