कल्याण-डोंबिवली महापालिकेत फाईल्सची हेराफेरी? ‘या’ विभागातून 5 फाईल्स गहाळ
VIDEO | कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी फाईल गहाळ प्रकरणी केली मोठी कारवाई, 5 अधिकाऱ्यांना नोटीस तर...
ठाणे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांच्या नकळत प्रस्ताव तयार केला होता, याची माहिती केडीएमसी आयुक्तांना मिळाली असल्याने त्यांही हा प्रस्ताव रोखत याप्रकरणी पाच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याच प्रस्तावाच्या बांधकाम विभागातून पाच फाईल्स गहाळ झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी पालिका प्रशासनाने लक्ष्मण दिवेकर नावाच्या शिपायाला निलंबित केले आहे. आयुक्तांनी संबंधित विभागाला विचारणा केल्यानंतर त्या पाच फाईल्स गायब झाल्याची बाब उघड झाली. फाईल सापडत नसल्याने त्या हाताळणाऱ्या लक्ष्मण दिवेकर नावाच्या शिपायाकडे विचारणा करण्यात आली. त्यांनीही या फाईल बद्दल माहिती नसल्याचे सांगितले असता फाईल हाताळणाऱ्या लक्ष्मण दिवेकर या शिपायाला आयुक्तांनी तात्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणात पालिका प्रशासनाने शिपायाला निलंबित केले असले तरी या फाईल्स दालनाच्या बाहेर गेल्या कशा. यामध्ये अधिकाऱ्यांची गडबड झाली की आणखी काही काळे बेरे यामागे होते. पालिका आयुक्तांच्या नकळत कामाचे प्रस्ताव तयार होतात कसे ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.