Kishori Pednekar यांच्या अडचणीत वाढ, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
VIDEO | मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर आणि माजी अतिरिक्त आयुक्तांविरोधात मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, काय आहे प्रकरण?
मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी PMLA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीकडून किशोरी पेडणेकर आणि माजी अतिरिक्त आयुक्तांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळात अधिक दराने बॉडी बॅग खरेदी करून घोटाळ्याचा आरोप आहे. तर या कथित घोटाळ्यामध्ये तब्बल ४९ लाखांपेक्षा अधिकची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय. कोरोना संसर्गाच्यावेळी कोव्हिड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. बॉडी बॅगज खरेदीतही घोटाळा झाला होता. बॉडी बॅग खरेदीबाबत यापूर्वी ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली होती. त्यानुसार २ हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग ६ हजार ८०० रुपयांना विकत घेण्यात आली होती.