Kolhapur 'गोकुळ'ची सभा अन् वादाची परंपरा कायम, पाटील-महाडिक आमने-सामने, नेमकं काय घडलं?

Kolhapur ‘गोकुळ’ची सभा अन् वादाची परंपरा कायम, पाटील-महाडिक आमने-सामने, नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 16, 2023 | 9:11 AM

tv9 Special Report | 'गोकुळ' दूध संघाच्या 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तुफान राडा, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आणि महाडिक गटाचे समर्थक वार्षिक सभास्थळी आले आमने-सामने

कोल्हापूर, १६ सप्टेंबर २०२३ | कोल्हापुरातल्या गोकूळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गोंधळ झाला. सतेज पाटील आणि महाडिकांचे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सभेत झालेल्या गोंधळादरम्यान, कुणी बॅरिकेट तोडण्याचा प्रयत्न केला तर कुणी बॅरिकेटवरुन उड्या मारुन सभेत प्रवेश केला. तर कुणी पोलिसांची नजर चुकवून दुसऱ्याच बाजूनं सभेत एन्ट्री केल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघाची 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा होती. या सभेत अपेक्षेप्रमाणे गोंधळ झाला. सतेज पाटलांचे समर्थक सभासद आधीच सभास्थळी पोहोचले होते. पण महाडिक गटाचे समर्थक असलेले सभासद मात्र सभास्थळाच्या बाहेर होते. सतेज पाटील समर्थक ठरावधारक आधीच सभास्थळी पोहोचले होते. मात्र सतेज पाटलांनी सभेत बोगस ठरावधारक घुसवल्याचा आरोप महाडिक गटानं केला. बघा काय केले आरोप-प्रत्यारोप?

Published on: Sep 16, 2023 09:11 AM