Kunal Kamra : ‘माझ्या जीवाला धोका, मला अटक…’, कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
मुंबईमध्ये अटकेच्या भीतीमुळे कुणाल कामरानं मद्रास हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मिळवला. आता कुणाल 31 तारखेला मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार आहे. दरम्यान त्यावेळी चोप देण्याचा इशारा शिंदेंच्या शिवसेनेने दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विडंबनात्मक गाणं केल्यानंतर कुणाल कामरावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यातच त्याला चोप देण्याची भाषा एकनाथ शिंदेंचे मंत्री उघडपणे करत आहेत. त्यामुळे कुणाल कामराने थेट मद्रासच्या हायकोर्टातून ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मिळवलाय. मुंबई पोलिसांनी हजर राहण्यासाठी कुणाल कामराला पोलिसांनी दोनदा समन्स बजावलंय. त्यामुळे ट्रान्झिट अटकपूर्ण जामिनासाठी कामराने मद्रासच्या हायकोर्टात धाव घेतली. ‘मी तामिळनाडूच्या विल्लुपुरमचा आहे, मुंबईमध्ये गेल्यावर मला अटक करतील. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे’, असं कामरांना हायकोर्टामध्ये म्हटले. त्यानंतर मद्रास हायकोर्टानं 7 एप्रिलपर्यंत ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला म्हणजेच कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक करता येणार नाही. आता 31 तारखेला कामरा मुंबईच्या खार पोलिस स्टेशनमध्ये हजर राहणार आहे. ठाण्याची रिक्षा चेहऱ्यापेक्षा दाढी, असं म्हणत गद्दार नजर आए… असं व्यंगात्मक गाणं कामराने तयार केलं. त्यावरून ज्या ठिकाणी कामराचा कॉमेडी कार्यक्रम झाला, त्या द युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओची तोडफोड केली. पण त्याच वेळी उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करून बदनामी केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा देखील दाखल झाला. मात्र कामरा मुंबईतून तामिळनाडूमध्ये गेला. तर शिंदेंचे मंत्री थर्ड डिग्रीचा इशारा देत आहेत.

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?

VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
