Kamra New Video : ‘साडीवाली दीदी, सॅलरी चुराने ये है आयी’, शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर निशाणा
एकनाथ शिंदेंवर एका गाण्यातून टीका केल्यानंतर माफी मागणार नसल्याचं म्हणत कुणाल कामराने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ पोस्ट केल्याचे दिसत आहे.
कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर विडंबनात्मक गाणं तयार केल्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून कुणाल कामराला दुसरं समन्स बजावण्यात आलं. त्यानंतरही कामाराने नवा व्हिडीओ ट्वीट केला आहे. एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक कारवाई केल्यानंतर खवळलेल्या शिवसैनिकांनी खार इथल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली होती. असं असतानाही कामरानं आपलं दुसरं गाणं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.
“आपका टॅक्स का पैसा हो रहा है हवाहवाई इन सडकों की बर्बादी, करने सरकार ये आयी मेट्रो है इनके मन मैं, खोद कर ये ले अंगडाई ट्रॅफिक बढाने ये है आयी, ब्रिजेस गिराने है ये आयी कहते है इसको तानाशाही”, असं म्हणत कुणाल कामराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर उपरोधिकपणे भाष्य करत निशाणा साधला आहे. पुढे त्याने असंही म्हटलंय, “देश में इतनी महंगाई, सरकार के साथ है आयी लोगों की लुटने कमाई, साडीवाली दीदी आयी सॅलरी चुराने ये है आयी, मिडल क्लास दबाने ये है आयी पॉपकॉर्न खिलाने ये है याई कहते है इसको निर्मला ताई”, असं म्हणत निर्मला सीतारमण यांच्यावर खोचकपणे भाष्य करत निशाणा साधला आहे.
View this post on Instagram

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
