एकीकडं मान्सूनची प्रतिक्षा तर दुसरीकडे 'या' राज्यातील १०२ गावांमध्ये पाण्याची टंचाई

एकीकडं मान्सूनची प्रतिक्षा तर दुसरीकडे ‘या’ राज्यातील १०२ गावांमध्ये पाण्याची टंचाई

| Updated on: Jun 09, 2023 | 4:31 PM

VIDEO | अनेक गावांमध्ये पाणी पुरवठ्याची योजना मंजूर पण त्या कागदावरच....

लातूर : राज्यात पावसाची प्रतिक्षा असताना अद्याप काही ठिकाणी उन्हाचा कडाका जाणवत असल्याचे चित्र आहे. मान्सूनपूर्व पावसाची आतुरता असतानाही पाऊस अजून आलेला नाही. अशातच लातूर सारख्या जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमधे आता पाणी टंचाई तीव्र झाली आहे . १०२ गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच ९० गावांना अगोदरच अधिग्रहण केलेल्या विहरी, तलाव आणि बोअरवेल्सवरून पाणी पुरवठा केला जातो आहे . अनेक गावांमध्ये पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली आहे. पण त्या पाणी योजना त्या गावात कार्यान्वित झाल्या नसल्याने टंचाई जाणवत आहे. अहमदपूर आणि औसा तालुक्यात सर्वात जास्त टंचाई जाणवत आहे. लातूरकरांना या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अहमदपूर तालुक्यात ३५ तर औसा तालुक्यात २६ गावांमधे पाण्याची टंचाई जाणवते आहे.

Published on: Jun 09, 2023 04:31 PM