Vijay Wadettiwar : कंत्राटी भरतीवरून सरकारचा घुमजाव, भाजपनं नाक घासावं अन्…, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
VIDEO | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली
नागपूर, २१ ऑक्टोबर २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द होत असल्याचे जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितल्यानंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. तर यावरूनच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय. वडेट्टीवार म्हणाले, ‘जीआर निघाला त्यावेळी भाजप हा पक्ष विरोधात होता. मग तेव्हा भाजपने त्या जीआरचा विरोध का केला नाही? मूग गिळून का होते. सगळ्या कंपन्या स्वतःच्या होत्या म्हणून? तुम्ही त्यात वाटेकर होते म्हणून?’, असे आक्रमक सवाल त्यांनी केले. तर गेल्या अडीच वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात. मह त्या अडीच वर्षात जीआर रद्द करण्याच निर्णय का घेतला गेला नाही? काँग्रेसच्या काळातील कंत्राटी भरतीचा जीआर केवळ १५ संवर्गांसाठी असा मर्यादित होता. तो जीआर बदलून तुमच्या सरकारने १३४ संवर्गांसाठी केला म्हणजे हा निर्णय तुम्ही घेतला. त्यामुळे भाजपने नाक घासून प्रायश्चित केलं पाहिजे, असेही ते म्हणाले.