आमची घरं तोडण्याचं काम सुरु, आमच्या माणसांना पोलीस मारतायत, आम्ही कुठे जायचं?’, चिमुकल्याचा सवाल
सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी आंबील ओढ्यात कशी कारवाई केली, याची माहिती देताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. बोलता बोलता तो धायमोकलून रडायला लागला
पुणे : बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी आंबील ओढ्यातील घरांच्या तोडफोडीला मोठा विरोध केला आहे. आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी प्रशासनासमोर गयावया केली. पण प्रशासनाने कुणाचीही बाजू न ऐकता आपली कारवाई सुरुच ठेवली. याचदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एक चिमुकला माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत होता. सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी कशी कारवाई केली, याची माहिती देताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. बोलता बोलता तो धायमोकलून रडायला लागला.
Published on: Jun 24, 2021 11:06 AM
Latest Videos

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
