शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगचा चिमुकला फॅन पाहिलात का? हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगचा चिमुकला फॅन पाहिलात का? हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

| Updated on: Jan 19, 2023 | 10:46 AM

काय डोंगर, काय झाडी या डॉयलॉग मुळे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील प्रसिद्धी झोतात आले आहेत. मात्र त्यांच्या डॉयलॉगची लहान चिमुकल्याला देखील भुरळ पडल्याचे दिसून आले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे गटातील बंडखोर आमदार आणि काही खासदार राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान काही दिवस गुवाहाटीमध्ये होते. यावेळी शिंदे समर्थक आमदार शहाजीबापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल हा डायलॉग तुफान गाजला. यावरून अनेक मिम्स, गाणी, व्हिडिओ आणि रिल देखील व्हायरल झाले.

काय डोंगर, काय झाडी या डॉयलॉग मुळे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील प्रसिद्धी झोतात आले आहेत. मात्र त्यांच्या डॉयलॉगची लहान चिमुकल्याला देखील भुरळ पडल्याचे दिसून आले आहे. बीडमध्ये एका कार्यक्रमानिमित्त शहाजी बापू आले होते. ज्ञानविजय बाजीराव चव्हाण हा सहा वर्षाचा चिमुकला शहाजीबापूच्या जवळ जाऊन त्याने त्यांचाच डॉयलॉग त्यांना म्हणून दाखविला. त्याच्या तोंडून डॉयलॉग ऐकून मंत्री शंभूराज देसाई आणि शहाजी बापू यांना हसू आवरता आले नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच चर्चेला आला आहे. इतकेच नाही तर हा व्हिडिओ तुफान व्हायरल देखील होत आहे.

Published on: Jan 19, 2023 10:39 AM