लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमाम्यहम्... अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीचं घ्या tv9 वर मुखदर्शन

लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमाम्यहम्… अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीचं घ्या tv9 वर मुखदर्शन

| Updated on: Jan 19, 2024 | 4:53 PM

अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होत असलेल्या रामलल्लाच्या मूर्तीचं मुखदर्शन tv9 मराठीवर दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे tv9 मराठीच्या प्रेक्षकांना अयोध्येतील या ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात ही रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली आहे.

मुंबई, १९ जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त अयोध्यानगरीत संपूर्ण राममय वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर अयोध्येप्रमाणे देशभरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. अशातच अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होत असलेल्या रामलल्लाच्या मूर्तीचं मुखदर्शन tv9 मराठीवर दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे tv9 मराठीच्या प्रेक्षकांना अयोध्येतील या ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात ही रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली आहे. दरम्यान, कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरूण योगीराज यांनी ही सुबक मू्ती साकारली आहे. कृष्णशिळेतून घडवलेली ही रामाची मूर्ती अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. सध्या या मूर्तीची पहिली झलक आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतांना दिसताय. त्यामुळे रामभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.

Published on: Jan 19, 2024 04:53 PM