Manoj Jarange Patil LIVE | मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत शिंदे सरकारची लाईव्ह चर्चा

Manoj Jarange Patil LIVE | मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत शिंदे सरकारची लाईव्ह चर्चा

| Updated on: Jan 02, 2024 | 6:47 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची ही बैठक होत आहे. या बैठकीला अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारसोबत चर्चा करण्यासाठी सहभागी झाले आहेत

जालना, २ जानेवारी २०२४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची ही बैठक होत आहे. या बैठकीला अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारसोबत चर्चा करण्यासाठी सहभागी झाले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या मागण्या आणि भूमिका मनोज जरांगे मांडत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी आज घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण उपसमितीसोबत बैठक पार पडली. तर या बैठकीनंतर लगेचच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक होत आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक पार पडण्याआधी मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात सर्व कुणबी आहेत. त्याचे सर्व पुरावे सरकारला दिले आहेत. ओबीसींच्या 83 क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच असल्याचं माध्यमांना प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

Published on: Jan 02, 2024 06:47 PM