अखेर ‘मविआ’चा फॉर्म्युला ठरला, लोकसभेसाठी कोणाला किती जागा निश्चित?
महाविकास आघाडीचा 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समोर येत आहे. यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबई, १८ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीकरता महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्यला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीचा 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समोर येत आहे. यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ होणार असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गट सर्वाधिक 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीच्या आज ठरलेल्या फॉर्म्युल्यात वंचित बहुजन आघाडीचा समावेश नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’कडे दिली आहे. पण तरीदेखील वंचितसाठी 4 जागा सोडण्याचा विचार महाविकास आघाडी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बघा कोणत्या जागेवर कोण लढणार?