VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 15 May 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या, हिंदुत्व, महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन जोरदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्या मैदानावरील सभेत बोलताना अयोध्येच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. ‘भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली, काय विनोद आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या, हिंदुत्व, महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन जोरदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्या मैदानावरील सभेत बोलताना अयोध्येच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. ‘भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली, काय विनोद आहे. बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा’, असं आव्हानच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. त्यानंतर शनिवारी बीकेसीतील मैदानात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार केलाय. त्यावर फडणवीसांनीही ट्वीट करत अजून एक टोमणे बॉम्ब, असा टोला लगावला आहे.
Latest Videos