MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 6 PM | 7 October 2021
पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया, अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी, डीबी रियालिटी, विवेक जाधव यांचे घर, अशा काही ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी सुरु आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांच्या तीन बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्याच बरोबर काही साखर कारखान्यांवर छापा टाकण्यात आलाय. हे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे आता अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारु सुरु आहे.
पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया, अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी, डीबी रियालिटी, विवेक जाधव यांचे घर, अशा काही ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
Latest Videos