‘अंकल…अंकल, काकींना नाव सांगेल हं…’, भर सभागृहात अजित पवार यांनी कुणाला डिवचलं, बघा व्हिडीओ
VIDEO | अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत या नेत्यावर साधला निशाणा, अन् एकच हशा पिकला...
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला चांगले फटकारले. यावेळी त्यांनी एक खळबळजनक दावा देखील केला देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद न मिळाल्याने भाजपने भाजपचे ८० ते ८५ आमदार बंडखोरीच्या तयारीत होते, असे म्हटले. पुढे चे असेही म्हणाले, सत्ताधारी पक्ष केंद्रात सत्तेवर आहे, राज्यात सत्तेवर आहे. मात्र तरीही भाजपचा दुसऱ्या पक्षातील आमदारांवर डोळा आहे. तर दुसरा आमदार कसा आमच्याकडे येईल, असं भाजप बघत असतं, ही अवस्था भाजपची झालीये. अजित पवारांच्या या विधानावर भाजप नेते गिरीश महाजन काहीतरी बोलू लागले. त्यावर गिरीश महाजन एक मिनिट..आता माझं भाषण होतं ना…अंकल अंकल काकींना सांगेल हा…असे म्हणत अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला.