Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 ऑगस्टला कोण कुठं करणार झेंडावंदन? पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी शिंदे सरकारकडून यादी जाहीर

15 ऑगस्टला कोण कुठं करणार झेंडावंदन? पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी शिंदे सरकारकडून यादी जाहीर

| Updated on: Aug 10, 2023 | 10:56 PM

VIDEO | 15 ऑगस्टला पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी शिंदे सरकारनं काढला मधला मार्ग, जाहीर केली ‘ही’ यादी

मुंबई, १० ऑगस्ट २०२३ | भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट आता जवळ आलाय. या दिवशी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतात. पण पालकमंत्र्यांची यादी सध्या जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण झेंडावंदन करणार? असा प्रश्न होता. या प्रश्नावर शिंदे सरकारने मधला मार्ग काढलाय. राज्य सरकारने 15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी यादी जाहीर केली आहे. पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ज्या जिल्ह्यांची नावे नाहीत तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. बघा कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात करणार ध्वजारोहण…

15 ऑगस्टला कोण कुठे झेंडावंदन करणार?

  • देवेंद्र फडणवीस – नागपूर
  • अजित पवार – कोल्हापूर
  • छगन भुजबळ – अमरावती
  • सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
  • चंद्रकांत पाटील – पुणे
  • दिलीप वळसे पाटील – वाशिम
  • राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
  • गिरीश महाजन – नाशिक
  • दादा भुसे – धुळे
  • गुलाबराव पाटील – जळगाव
  • रविंद्र चव्हाण – ठाणे
  • हसन मुश्रीफ – सोलापूर
  • दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
  • उदय सामंत – रत्नागिरी
  • अतुल सावे – परभणी
  • संदीपान भुमरे – औरंगाबाद
  • सुरेश खाडे – सांगली
  • विजयकुमार गावित – नंदुरबार
  • तानाजी सावंत – उस्मानाबाद
  • शंभूराज देसाई – सातारा
  • अब्दुल सत्तार – जालना
  • संजय राठोड – यवतमाळ
  • धनंजय मुंडे – बीड
  • धर्मराव आत्राम – गडचिरोली
  • मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
  • संजय बनसोडे – लातूर
  • अनिल पाटील – बुलढाणा
  • आदिती तटकरे – पालघर

Published on: Aug 10, 2023 10:53 PM