Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : नाशिकमधील दुर्घटना नेमकी का घडली? नेमकं काय चुकलं? आरोग्यमंत्र्यांकडून सविस्तर माहिती

| Updated on: Apr 21, 2021 | 7:05 PM

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याबाबत सविस्तर माहिती दिली (Rajesh Tope on oxygen tanker leaked in Nashik).

नाशिक : नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain hospital)  आज भयानक घटना घडली. ऑक्सिजन टँकर लीक झाल्याने रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे 22 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. या घटनेमुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृतकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर टाहो फोडला आहे. त्यांच्या डोळ्यांमधील अश्रूंना नेमकं काय उत्तर द्यावं, त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी नेमकी कशी भरुन काढावी? याचं उत्तर प्रशासनासह कुणाकडेही नाही. या दुर्घटनेप्रती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. यावेळी ते भावूकही झाले. टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याबाबत सविस्तर माहिती दिली (Rajesh Tope on oxygen tanker leaked in Nashik).

Published on: Apr 21, 2021 07:05 PM