Satara MIDC : …अन्यथा भूखंड काढून घेण्याचा MIDC चा २०० हून अधिक उद्योजकांना इशारा
VIDEO | साताऱ्यातील २०० हून अधिक उद्योजकांना MIDC ची नोटीस, काय आहे कारण?
सातारा : सातारा जिल्ह्यातील 213 उद्योजकांना भूखंड विकसित करण्याच्या नोटीसा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नुसत्या नोटीसा नाही तर भूखंड काढून घेण्याचा एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या 200 हून अधिक उद्योजकांना इशाराही दिला आहे. सातारा जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या विकास कालावधीनंतर अनेक उद्योजकांनी सातारा एमआयडीसी येथे भूखंड विकसित न करता ताब्यात ठेवले आहेत. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 30 जून पर्यंत भूखंड विकसित करणार नाहीत, अशा उद्योजकांच्या भूखंड काढून घेण्यात येणार असल्याच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नोटीसा 213 उद्योजकांना पाठवले आहेत यामध्ये 47 भूखंडधारक उद्योजकांनी यामध्ये विशेष मुदतवाढ मिळावी, यासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.
Latest Videos
Latest News