रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर, नदी काठावरील दत्त मंदिर पाण्याखाली
VIDEO | रत्नागिरीच्या लांजामधील अंजणारी मठातील दत्त मंदिर पाण्याखाली, बघा दृश्य
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मोठी असणारी काजळी नदीच्या पाणी पातळीने देखील आपली पातळी ओलांडल्याने या नदीला पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामधील प्रसिद्ध असणारं अंजणारी मठातील दत्त मंदिर देखील अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे. काजळी नदी काठावरील हे दत्त मंदिर आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं नागरिकांना झोडपून काढलं आहे. मुंबईसह पुणे, रायगड आणि रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ठाणे,रत्नागिरी, चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २८ गावांतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.