विधानभवनावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा धडकणार, पण मागण्या काय?
नागपुरच्या टेकडी रोडवर हा मोर्चा अडविण्यात आला होता. पण शासनाकडे मागण्यापूर्ण केल्या जात नसल्याने आणि तोडगा निघाला नसल्याने सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर हा मोर्चा धडकणार आहे.
नागपूर, १५ डिसेंबर २०२३ : नागपूरच्या विधानभवनावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा मोर्चा आज धडकला. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी अंगणवाडीमधील हजारांवर अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या आहेत. नागपुरच्या टेकडी रोडवर हा मोर्चा अडविण्यात आला होता. पण शासनाकडे मागण्यापूर्ण केल्या जात नसल्याने आणि तोडगा निघाला नसल्याने सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर हा मोर्चा धडकणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे व ईतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4 डिसेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. वाशिम जिल्ह्यात अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेला संप अकराव्या दिवशीही सुरूच होता.तर शासनाकडे मागण्यापूर्ण केल्या जात नसल्याने अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही म्हणून हा मोठा मोर्चा काढण्यात आला आहे.