HSC Board Exam Video : पोरांनो…ऑल द बेस्ट! 12 वीची परीक्षा उद्यापासून अन् ‘या’ दिवशी लागणार रिझल्ट
परीक्षा दहा दिवस आधी घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होतेय. यंदा दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होतेय. परिक्षार्थींची परीक्षेची तयारी झाली असून पोटात गोळा आला असला तरी पठ्ठे परीक्षा देण्यासाठी तयार झाले आहेत. यंदा एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यी बारावीची परीक्षा देत आहेत. यंदा बारावाची परीक्षा दहा दिवस आधी घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निकालही लवकर जाहीर करणार आहोत, 15 मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. यंदा बारावीच्या एकूण 15 लाख 5 लाख 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली असून यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली तर 37 ट्रान्सजेंडर परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान 7 लाख 68 हजार 967, कला 3 लाख 80 हजार 410 आणि वाणिज्य 3 लाख 19 हजार 439 विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत. सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून दिले जाणार आहेत, या आधी पेपरच्या आधी 10 मिनिटं वाढवून दिले जात होते. संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे. असल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
