Special Report | लोकसभा निवडणुकीसाठी 16 चा फॉर्म्युला? नेमका काय आहे ‘मविआ’चा तोडगा!
VIDEO | लोकसभा निवडणुकीसाठी समसमान फॉर्म्युल्यावर मविआचा तोडगा, काय आहे महाविकास आघाडीचा 16 चा फॉर्म्युला? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी वर्षभराचा कालावधी असला तरी महाविकास आघाडीनं आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. तर प्रत्येकी १६ जागांवर चर्चा झाल्याचे समोर येत आहे. लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागांचं कसं वाटप करायचं याची चर्चा सुरू झाल्याची माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी १६ जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरूये. या होणाऱ्या फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. यावर जर शिक्का मोर्तब झालं तर ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी १६ जागा मिळतील. समसमान जागांवर लढायचं म्हटलं तर तिनही पक्षांना १६ जागा येतात. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा विजय मिळवला तर भाजपला पराभूत करता येऊ शकतं असा आत्मविश्वास मविआमध्ये संचारला. यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेत तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सिल्व्हर ओकवर बोलावलं आणि जागा वाटपावर चर्चा सुरू झाली. भाजपला पराभूत करायचं असेल तर मतांचं विभाजन टाळणं आवश्यक आहे. हे मविआला चांगलंच माहितीये. त्यामुळे जागा वाटपाच्या या १६ च्या फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षांचं एकमत होऊ शकतं. तसं झालं तर एकूण लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागांपैकी अनुक्रमे तिन्ही पक्षांच्या वाटेला १६ आणि ९६ जागा वाटेला येतील… बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…