Aaditya Thackeray | ममतादीदींंनी मुख्यमंत्र्यांना शुभसंदेश दिला – आदित्य ठाकरे
ममता बॅनर्जी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलीय.
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्या मुंबईत दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचं (SiddhiVinayak Temple) दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. त्यानंतर ममता बॅनर्जी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलीय.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
