Santosh Deshmukh Case : मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग…
सरपंच हत्या प्रकरणाचं मूळ खंडणी प्रकरणात आहे. खंडणीतूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्याच्या मास्तरमाइंड वाल्मीक कराड असल्याचा आरोप आहे. आणि हाच वाल्मीक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे. त्यामुळे मारेकरी फासावर लटकेंपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी संदीप शिरसागर आणि नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत परभणीत काल सर्वपक्षीय मोर्चा निघाला. या मोर्चांची सांगता झाल्यानंतर जरांगे आणि सुरेश धस यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे आले. जरांगेंनी तर मुंडेंना रस्त्यावर फिरून न देण्याचा इशारा दिला. ‘आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला. या मुंड्याचा आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. परळी असो बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि धाराशिव यांना घरात घुसून मारणार…’, असा इशाराच जरांगेंनी मुंडेंना दिला. भाजपचे अष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आकाचे आका म्हणत नाव न घेता मंत्री धनंजय मुंडेंना जेलवाडीचा इशारा दिलाय. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ पाहिला असेल तर आकाच्या आकाचाही नंबर लागू शकतो असं धस म्हणालेत. दिघोळे पासून ते संतोष देशमुख यांपर्यंत बीडमध्ये ज्या हत्या झाल्यात त्यामागे कोण आहे? क्या हुवा तेरा वादा असं म्हणत सुरेश धस यांनी अजित पवारांना सुद्धा सवाल केलाय. ‘अजित दादा, क्या हुवा तेरा वादा? ये अंदर लेने क्या जैसा नहीं है. संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्येचे बेरेज केलेत अजित दादा जरा हिशोब करा.’, असं सुरेश धस म्हणाले.