Manoj Jarange Patil यांचे कुटुंबीय आंदोलनस्थळी; आई म्हणाल्या, ‘माझ्या बाळाला…’
VIDEO | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस, जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांनी दिली आंदोलनस्थळी भेट, यावेळी भावूक होत जरांगे पाटील यांच्या आईंनं दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
जालना, ८ सप्टेंबर २०२३ | गेल्या अकरा दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. गेल्या ११ दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू आहे. आता त्यांच्या प्रकृतीतही थोडा बदल झालेला दिसत असून प्रकृती खालावली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हाटायचं नाही असा निश्चय केलेल्या जरांगे यांना आंदोलनस्थळी सलाईन सुद्धा लावण्यात आली होती. तर आज सराटी या गावातील आंदोलनस्थळी जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली. त्यांची प्रकृती खालावत असल्याने आज त्यांची आई प्रभावती जरांगे यांनी आपल्या लेकाला भेट दिली. आपल्या आईला आंदोलनस्थळी येताना पाहून जरांगे पाटील हे भावनिक झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला. जरांगे पाटील यांनी आईच्या पायावर डोकं ठेवलं. त्यानंतर त्यांनी आईला मिठी मारली. यावेळी दोघेही भावूक झाले. यावेळी टिव्ही ९ मराठी बोलताना आई म्हणाल्या, ‘माझ्या मुलाच्या पाठी उभं रहा. मराठ्यांना आरक्षण द्या, माझ्या बाळाला न्याय द्या. सर्व बाळांना न्याय द्या.’