मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्याच अटकेची व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
जरांगे पाटील यांनी जालन्यातील सभेतून थेट सरकारला पुन्हा २४ डिसेंबरची आठवण करून देत अल्टिमेटम दिलाय. लाठीचार्जनंतर आणि त्यादरम्यान झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, नाहीतर सरकारचं ऐकणार नाही, जरांगे नेमकं काय म्हणाले?
मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्याच अटकेची शंका व्यक्त केली आहे. सरकारने आंदोलकांना अटक करण्यास सुरूवात केली आहे, त्यामुळे मला अटक केली तर माझी तयारी आहे. मग सरकारला मराठा समाज काय? हे कळेल असा जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांनी जालन्यातील सभेतून थेट सरकारला पुन्हा २४ डिसेंबरची आठवण करून देत अल्टिमेटम दिलाय. लाठीचार्जनंतर आणि त्यादरम्यान झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, नाहीतर सरकारचं ऐकणार नाही, असं जरांगे म्हणाले. दगडफेक आणि जाळपोळीप्रकरणी दाखल झालेले गुन्हे कायदेशीर आणि नियमानुसारच आहेत, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं. त्यामुळे हे गुन्हे मागे होतील असे दिसत नाही. यावर काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ आणि त्यांनी कोणती केली मागणी?
Published on: Dec 03, 2023 11:44 AM
Latest Videos