आधी छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका, आता माघार; मनोज जरांगे पाटलांकडून ‘तो’ शब्द मागे
लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील खराडी येथील सभेत केले होते. मात्र आता याच वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. लायकी या शब्दावरून छगन भुजबळ यांच्यावर केलेली टीका आणि तो शब्द मागे
मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलेच शाब्दिक वार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील खराडी येथील सभेत केले होते. मात्र आता याच वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. लायकी या शब्दावरून छगन भुजबळ यांच्यावर केलेली टीका आणि तो शब्द जरांगे यांनी जाहीरपणे मागे घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांच्या प्रतिनिधीने मनोज जरांगे पाटील यांना ती टीका चुकीचं आहे असे वाटते का? असा सवाल केला असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही सारखं ते लावून का धरलं मला माहिती नाही. पण मी माझे शब्द मागे घेतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

