Manoj Jarange Patil : तुमच्या हातात १० दिवस, जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर…, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
VIDEO | जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात आज हजारो बांधवांचं भगवं वादळ रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. आज जरांगे पाटील यांच्या संवाद यात्रेतील सांगता सभा अंतरवाली सराटी या गावात झाली. यावेळी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिल्याचे पाहायला मिळाले
जालना, १४ ऑक्टोबर २०२३ | जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात आज हजारो बांधवांचं भगवं वादळ रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. आज मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद यात्रेतील सांगता सभा जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला धारेवरच धरलं आहे. मनोज जरांगे हे सरकारला अल्टिमेटम देत म्हणाले, घराघरातील मराठा या आरक्षणासाठी पेटून उठला आहे. सरकारला विनंती आहे. तुमच्या हातात ४० दिवसापैकी १० दिवस शिल्लक आहे. राहिलेल्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. मराठा समाजानं जो शब्द दिलाय त्यावर मराठा समाज ठाम आहे. ४० दिवस आम्ही एक शब्द देखील आरक्षणासंदर्भात सरकारला विचारला नाही. तर या १० दिवसात मराठ्यांना मराठा आरक्षण पाहिजे आणि जर नाही तर ४० व्या दिवशी सांगू, काय करणार असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सूचक इशारा राज्य सरकारला दिलाय.