Khel Ratna Award 2024 : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह आणखी कोणाचा सन्मान?

Khel Ratna Award 2024 : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह आणखी कोणाचा सन्मान?

| Updated on: Jan 02, 2025 | 4:08 PM

चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिक प्रवीण कुमार या चौघांना खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार...

भारत देशासाठी विविध क्रीडा प्रकारात २०२४ या वर्षात विशेष आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. नुकतीच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२४ ची घोषणा करण्यात आली आहे. चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिक प्रवीण कुमार या चौघांना खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला नेमबाजपटू मनु भाकर हिने एकाच स्पर्धेत दोन पदकं मिळवून इतिहास घडवला होता. तर हॉकी टीम इंडियाने कॅप्टन हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात ऑलिम्पिकमध्ये सलग दुसर्‍यांदा मेडल मिळवलं होतं. यासोबत चेसमध्ये विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता होण्याचा बहुमान डी गुकेश याने मिळवला होता. दरम्यान, डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिक प्रवीण कुमार या चौघांसह एकूण ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारने गौरवण्यात येणार आहे.

Published on: Jan 02, 2025 04:08 PM