'ओबीसी बांधवांनी आमच्या मागणीला विरोध करू नये, कारण...', विनोद पाटील यांनी काय केली विनंती?

‘ओबीसी बांधवांनी आमच्या मागणीला विरोध करू नये, कारण…’, विनोद पाटील यांनी काय केली विनंती?

| Updated on: Sep 08, 2023 | 4:36 PM

VIDEO | ओबीसी बांधवांनी आमच्या मागणीला विरोध करू नये त्यांनी सामाजिक चष्म्यातून आमच्याकडे बघितले पाहिजे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ओबीसी समाजाला केली विनंती.

औरंगाबाद, ८ सप्टेंबर २०२३ | मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेल्या ११ दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. मात्र आता त्या आंदोलनाला फाटे फुटताना दिसतंय. यावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. टिकणारे आरक्षण मिळावे हीच मराठा समाजाची मागणी आहे, कायद्यात बसणारी आमची ही मागणी असल्याचे विनोद पाटील यांनी म्हटले आहे. ते असेही म्हणाले, ‘हैदराबादमधून आम्ही महाराष्ट्रात सामील झालो तेव्हा आमच्या फक्त सीमा बदलल्या आहेत, मात्र आम्ही जे होतो तेच आहोत त्यामुळे आमच्या सवलती कशा काय बंद होऊ शकतात?’ असा सवाल करत त्यांनी आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, यावर ठाम असल्याचे बोलून दाखवले.

तर सरकारला प्रश्न कळलेला आहे, आता सरकारने ठोस पाऊल उचलले पाहिजे, ओबीसी हे आमचे बांधव आहेत, हे कागदोपत्री सिद्ध झाले आहे, त्यामुळे ओबीसी बांधवांनी आमच्या मागणीला विरोध करू नये त्यांनी सामाजिक चष्म्यातून आमच्याकडे बघितले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Sep 08, 2023 04:36 PM